Babanrao Taywade Jai OBC : फायदे घेताना ओबीसी! जय ओबीसी म्हणताना लाज वाटते... तायवाडेंनी वडेट्टीवारांना हाणला टोला

Babanrao Taywade Jai OBC
Babanrao Taywade Jai OBC PUDHARI
Published on
Updated on

Babanrao Taywade Jai OBC Fake Kunbi: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी मराठा कुणवी जातीच्या प्रमाणपत्राबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी जर कुणी बोगस मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवत असेल तर त्या व्यक्तीला आजन्म कारावासाची शिक्षा करण्याची तरतूद करावी अशी मागणी केली आहे. त्यांनी भविष्यात कोणी असं कृत्य करण्याची हिंमत होणार नाही असं म्हणत याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे सांगितलं. तसेच जय ओबीसीवरून तायवाडे यांनी वडेट्टीवार यांना देखील टोला लगावला.

Babanrao Taywade Jai OBC
OBC Mandal Yatra : ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी विदर्भात धडकणार 'मंडल यात्रा'; ३ ऑगस्टला भंडाऱ्यातून प्रारंभ

जर बोगस ओबीसी प्रमाणपत्र मिळवल्याने खऱ्या ओबीसी समसाजाचं नुकसान होतंय असं तायवाडे यांनी सांगितलं. सरकारने निवडणूक अर्ज भरण्यापूर्वीच व्हॅलिडिटी मागायला हवी अशी मागणी केली.

तायवाडे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर देखील भाष्य केलं. त्यांनी जर ओबीसी असाल तर लाज कसली. फायदे घेताना ओबीसी, जय ओबीसी म्हणायचं आणि नंतर ओबीसी म्हणायला लाज वाटते असं म्हणजे मंडल यात्रेवरून विजय वडेट्टीवार यांना टोला हाणला.

Babanrao Taywade Jai OBC
OBC Janmorcha Demand : ओबीसी कल्याण मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष बावनकुळे यांनी राजीनामा द्यावा

जोपर्यंत ओबीसी एकमेकांना जय ओबीसी म्हणत शुभेच्छा देत नाही तोपर्यंत ओबीसी चळवळ मोठी होणार नाही. लपून ओबीसी म्हणण्यापेक्षा खुलेआम जय ओबीसी म्हणा असं देखील तायवाडे यांनी सांगितलं.

तायवाडे यांनी ६० टक्के ओबीसींचे नेतृत्व मी एकटा करू शकत नाही. त्यामुळे ज्या नेत्यांना ओबीसीचे नेतृत्व करायचं आहे त्यांनी पुढे यावे असे आवाहन देखील तायवाडे यांनी केलं. ओबीसी बॅनरखाली ओबीसी समाजाच्या मागण्या सरकारपुढे मांडून त्या पूर्ण करून घ्याव्या लागतील.

Babanrao Taywade Jai OBC
OBC Reservation : ओबीसी एकवटला तर पळता भुई थोडी होईल

जरांगेंच्या आंदोलनाबाबत तायवाडे यांनी आम्ही आमच्या संविधानाने दिलेल्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी सज्ज आहोत. ओबीसी आरक्षणाला सरकाने धक्का लावला तर देशातील ओबीसी समाज एकसंघ उभा राहील. आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराला धक्का लागू नये म्हणून आर पारची लढाईच लढत असतो. आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ देणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news