Manoj Jarange Patil Vs Ashish Shelar | मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनाची SIT चौकशीचे आदेश | पुढारी

Manoj Jarange Patil Vs Ashish Shelar | मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनाची SIT चौकशीचे आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधीमंडळ अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (दि.२७) दुसरा दिवस आहे. दरम्यान, विधानसभेचे कामकाज सुरू होताच, मराठा आरक्षणावरून सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. विरोधी पक्ष आणि सत्तांधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. दरम्यान, मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी जरांगे-पाटलांवर हल्लाबोल केला. जरांगेंच्या मागे कोण? कारखाना कोणाचा? याची SIT चौकशीची करण्याची मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सभागृहात केली. यानंतर जरांगे-पाटलांच्या आंदोलनाची SIT चौकशी व्हावी, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले. (Manoj Jarange Patil Vs Ashish Shelar)

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी तपासाची मागणी केल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते जरांगे-पाटील यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या दाव्याची एसआयटी चौकशीचे व्हावी, असे आदेश दिले आहेत.

पुढे बोलताना ॲड. शेलार म्हणाले, काल मी मनोज जरांगे-पाटील यांचा व्हिडिओ बघितला. यामध्ये महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यांच्यामागे कटकारस्थानाची भाषा आहे. जरांगेंची भाषा त्यांना शोभत नाही. राज्यात पंतप्रधानांविरोधात कटकारस्थान सुरू आहे. तसेच आमच्या जीवालादेखील धोका आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, असेही शेलार म्हणाले. (Manoj Jarange Patil Vs Ashish Shelar)

कुणा एकाला समाजाची मोनोपाली दिलेली नाही. आम्ही मराठा समाजासाठी प्राणपणानं काम करतोय. परंतु, जरांगेंमुळे मराठा समाजाची बदनामी होतेय. मोदींना चॅलेंज करणारे जरांगे कोण? सरकारला बेचिराख करण्याची भाषा कोणीही ऐकूण घेणार नाही. त्यामुळे मनोज जरांगे- पाटलांच्या मागे कोण आहे, याची चौकशी व्हावी अशी मागणी ॲड. आशिष शेलार यांनी सभागृहात बोलताना केली. (Manoj Jarange Patil Vs Ashish Shelar)

सरकारकडून फसवणूक, न्यायालयात जाणार : जरांगे पाटील

सरकारने सगेसोयरे अधिसूचनेना काढली मात्र अंमलबजावणी केली नाही. आमची फसवणूक केली आहे. सरकारने गुन्हे मागे घेतो बोलून घेतलेले नाहीत. अंतरवालीतील गुन्हे जाणूनबूजून दाखल केले असून यापुढेही गुन्हे दाखल होतील. संचारबंदी लावण्यासारखं काहीही झालं नव्हतं. याविरूद्ध न्यायालयात जाणार, तिथे आम्हाला न्याय मिळेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा:

 

 

Back to top button