Maharashtra Budget Session 2024 : अयोध्येमध्ये ‘महाराष्ट्र भवन’ उभारणार; अजित पवारांची घोषणा | पुढारी

Maharashtra Budget Session 2024 : अयोध्येमध्ये 'महाराष्ट्र भवन' उभारणार; अजित पवारांची घोषणा


पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा सन २०२४-२५ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थात लेखानुदान आज, मंगळवारी दुपारी दोन वाजता विधिमंडळात सादर करण्यात आले. अंतरिम अर्थसंकल्पात १ एप्रिल २०२४ ते ३१ जुलै २०२४ अशा चार महिन्यांसाठी लागणाऱ्या आवश्यक खर्चाची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला. अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. या अर्थसंकल्पावर २९ फेब्रुवारीला चर्चा होऊन तो मंजूर केला जाईल. (Maharashtra Budget Session 2024)

Live Update : 


क्रीडा विभागासाठी ५३७ कोटींच्या निधीची तरतूद


राज्यातील महसूली तूट ९९ हजार २८८ कोटी आहे.


महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पारितोषिक रकमेमध्ये १० पट वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदकासाठी १ कोटी, रौप्य पदकासाठी ७५ लाख, कांस्य पदकासाठी ५० लाख रूपये.


३७ हजार अंगणवाडी केंद्रांना सौर संच देणार


पाणीपुरवठा स्वच्छता विभागास ३८७५ कोटींचा निधी


अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारणार


कोकण विभागातील पर्यटनाला चालना देणार


ग्रामविकास विभागासाठी ९ हजार २८० कोटींची तरतूद


दिव्यागांसाठी नवीन घरे बांधली जाणार


ऊसतोड कामगारांसाठी अपघात नीधी


लेक लाडकी योजनेची माहिती देताना अजित पवारांची शायरी

बिजली चमकती है, तो आकाश बदल देती है,
आंधी उठती है तो दिन रात बदलती है,
जब गरजती है नारीशक्ती, तो इतिहास बदल देती है|


वनविभागासाठी २ हजार ५७ कोटींची तरतूद


उद्योग विभागासाठी १ हजाक २१ कोटी रूपये प्रस्तावित


शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेअंतर्गत ८ लाख ५० हजार नवीन सौर कृषीपंप बसवण्यात येतील.


सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत होणार


हर घर जल योजनेतून १ कोटी नळ जोडणार


राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित


जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच संग्रहालय उभारणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.


उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्पाचे वाचन सुरू आहे.


मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं : मुख्यमंत्री

इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं. सरकारने मराठा समाजाच्या न्यायासाठी भूमिका घेतली. ज्याप्रमाणे नोंदी सापडल्या त्याप्रमाणे प्रमाणपत्रं दिली. आधी सरसकट, नंतर सगेसोयरेचा मुद्दा आला. जरांगेंच्या मागण्या परिस्थितीनुसार बदलत गेल्या. पण कुणाच्या मनात संभ्रम नको. मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण टिकणारं आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


जरांगेंच्या आंदोलनामागे कोण हे शोधावं लागेल : फडणवीस

मराठा समाजासाठी मी काय केलं हे सर्वांना माहित आहे. मला कुणाच्या दाखल्याची गरज नाही. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं. उच्च न्यायालयात टिकवलं. लाठीचार्ज का झाला, याचं षडयंत्र बाहेर येतयं. जरांगेंच्या आंदोलनामागे कोण हे शोधावं लागेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत.


जरांगे पाटील यांना अटक करा : दरेकर

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पैसे कुठून आले याची ईडी चौकशी व्हावी. त्यांना अटक करावी, अशी मागणी आमदार प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली.


हातात नकली बंदुका घेऊन विरोधकांची घोषणाबाजी

राज्यातील गोळीबारावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. हातात नकली बंदुका घेऊन विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. शासन आपल्या दारी, गोळीबार घरोघरी, गेली शिवशाही आली गुंडशाही, अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली.


बारामतीत पवार विरूद्ध पवार लढत होऊ नये : रोहित पवार

शरद पवार यांच्या विरोधात बोलल्याशिवाय भाजपचं राजकीय भलं झालेलं नाही. पण सामान्य लोक येणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांचा करेक्ट कार्यक्रम करतील. अजित पवार यांचा भाजपने वापर केला आहे. अजित पवार यांचा चोरलेला का असेना पण एक वेगळा पक्ष आहे. संयुक्त ताकद नेहमीच मोठी असते. बारामती मतदारसंघात पवार विरूद्ध पवार लढत होऊ नये. पण ते जो उमेदवार देतील त्याविरूद्ध लढणे भाग आहे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. फोन टॅपिंगमध्ये माझाही नंबर असावा, पण आमची फोनवर फक्त लोकसेवेची बोलणी होते, असा आरोप रोहित पवार यांनी विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना केला आहे.


अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत करा : वडेट्टीवार

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने मागच्यावेळी घोषणा केलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. या बजेटमध्ये शेतकऱ्यांना भरपूर मदत करावी. शेतकऱ्यांच्या मागे उभे राहावे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांना उभे करण्यासाठी या बजेटचा उपयोग व्हावा. सरकारने केवळ पोकळ घोषणा करू नयेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. (Maharashtra Budget Session 2024)


विधानसभेत अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प मांडणार

लोकसभा निवडणूक एप्रिल मे महिन्यात होत असल्याने २००४ पासून दर पाच वर्षांनी राज्य सरकारला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लेखानुदान किंवा अंतरिम अर्थसंकल्प मांडावा लागतो. त्यानुसार उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार हे विधानसभेत तर विधान परिषदेत अन्य मंत्री अंतरिम अर्थसंकल्प मांडतील. अंतरिम अर्थसंकल्पात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, सरकारला फेडावे लागणारे कर्जाचे हप्ते, व्याज, लोकसभा निवडणुकीला लागणारा खर्च आदींचा समावेश आहे. विधान परिषदेत अर्थसंकल्प कुणी मांडायचा याचा निर्णय रात्री उशिरापर्यंत झाला नव्हता. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी एक तास अगोदर म्हणजे दुपारी एक वाजता याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अर्थसंकल्पावर २९ फेब्रुवारीला चर्चा होऊन तो मंजूर केला जाईल. (Maharashtra Budget Session 2024)

Back to top button