Manoj Jarange Patil : सरकारकडून फसवणूक, न्यायालयात जाणार : जरांगे पाटील

Manoj Jarange Patil : सरकारकडून फसवणूक, न्यायालयात जाणार : जरांगे पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : सरकारने सगेसोयरे अधिसूचनेना काढली मात्र अंमलबजावणी केली नाही. आमची फसवणूक केली आहे. सरकारने गुन्हे मागे घेतो बोलून घेतलेले नाहीत. अंतरवालीतील गुन्हे जाणूनबूजून दाखल केले असून यापुढेही गुन्हे दाखल होतील. संचारबंदी लावण्यासारखं काहीही झालं नव्हतं. याविरूद्ध न्यायालयात जाणार, तिथे आम्हाला न्याय मिळेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. (Manoj Jarange Patil)

छत्रपती संभाजीनगर येथे जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री कुणाचा करेक्ट कार्यक्रम बोलले ते ऐकुन घेतो. न्यायालयाने शांततेत रास्ता रोको आंदोलन करा, असे सांगितले होते. आम्ही शांततेत आंदोलन केले. कुठेही काही झाले नसताना गुन्हा का दाखल केला. सगेसोयऱ्याची अधिसुचना काढुनही अंमलबजावणी केलेली नाही. सोशल मीडिया खात्यावर बंदुका टाकायच्या हे गृहमंत्र्यांना शोभत का? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. जनता म्हणून आमची चूक झाली असेल पण तुम्ही सरकार म्हणून मायबाप आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या विरोधातच काम करणार. आतापर्यंत त्यांच्यावर आरोप केले नाहीत, पण त्यांनी चुकीच केले म्हणून बोललो. संचारबंदी लावायला काहीही झालं नव्हतं. अंतरवालीतील गुन्हे जाणूनबूजून ठेवले. त्यामुळे न्यायालयात जाणार, तिथे आम्हाला न्याय मिळेल, असे ते म्हणाले. (Manoj Jarange Patil)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news