बुलडाणा : तीन देशी पिस्टल, काडतूसांसह दोघांना अटक

बुलडाणा : तीन देशी पिस्टल, काडतूसांसह दोघांना अटक
Published on
Updated on

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा :

मध्य प्रदेशाच्या सिमा भागातून बुलडाणा जिल्ह्यात अवैध देशी पिस्टल विकण्यासाठी आलेल्या दोघांना एलसीबीच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली. बुलडाणा येथील वसाडी (ता. संग्रामपूर) परिसरात बुधवार (दि. ८) रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

याबाबतची माहिती अशी की, मध्य प्रदेशातील पाचोरी गावातून दोन व्यक्ती देशी बनावटीची पिस्टल्स विकण्यासाठी वसाडी (ता. संग्रामपूर) येथे येणार असल्याची गोपनीय माहिती एलसीबीच्या पथकाने मिळाली होती. यानंतर एलसीबीच्या पथकाने तेथे सापळा लावला.

याच दरम्यान दोघा संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्याच्याजवळ तीन देशी पिस्टल व सहा जिवंत काडतूसे सापडली. यानंतर एलसीबीच्या पथकाने दोघांना अटक केली.

सिताराम मोतीराम भिलाले (वय २३) व हिरचंद भूवानसिंग भिलाले( वय २२, रा. पाचोरी, ता.खकणार, जि.,बु-हाणपूर, मध्यप्रदेश) या दोघांना अटक करून शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

एलसीबीचे पोलीस निरिक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक अमित जाधव, निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news