बुलडाणा : भावजयीला आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्‍याप्रकरणी जामीनवर असलेल्‍या दीराची आत्‍महत्‍या

बुलडाणा :  भावजयीला आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्‍याप्रकरणी जामीनवर असलेल्‍या दीराची आत्‍महत्‍या
Published on
Updated on

बुलडाणा,पुढारी वृत्तसेवा :
भावजयीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेची कारवाई झालेल्या दिराने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मोताळा तालुक्यातील लिहा येथे घडली. याप्रकरणी संबंधित महिलेच्या दिरावर गुन्हा दाखल  झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिहा (ता.बुलडाणा­) येथील दीपक उर्फ रवींद्र गुलाब चरवंदे (30) या तरूणाने बुधवारी सायंकाळी घराच्या बाथरूममध्ये लोखंडी पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दीड महिन्‍यापूर्वी दीपकच्या भावजयीने आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा चरवंदे कुटुंबीयांसह दीपकवरही दाखल झाला होता. या प्रकरणात त्याला अटकही झाली होती.  जामिनावर सुटका झाल्‍यानंतर ताे तणावात दिसत होता. कुणाशीही बोलत नव्हता. त्या तणावातच दीपकने गळफास घेऊन आत्महत्या केली. यप्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे.

हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news