Corona Updates : दिवसभरात १ हजार २२५ कोरोनाग्रस्तांची भर, २८ रुग्णांचा बळी | पुढारी

Corona Updates : दिवसभरात १ हजार २२५ कोरोनाग्रस्तांची भर, २८ रुग्णांचा बळी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशात बुधवारी दिवसभरात १ हजार २२५ कोरोनाग्रस्तांची भर पडली. तर, २८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान, १ हजार ५९४ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७६% नोंदवण्यात आला. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.२०% आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ०.२३% नोंदवण्यात आला आहे. (Corona Updates)

देशात आता केवळ ०.०३ टक्के म्हणजेच १४ हजार ३०७ सक्रिय कोरोनाबाधित शिल्लक आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी ३० लाख २४ हजार ४४० पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी २४ लाख ८९ हजार ४ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख २१ हजार १२९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८४ कोटी ६ लाख ५५ हजार ५ डोस देण्यात आले आहेत. यातील २२ लाख २७ हजार ३०७ डोस बुधवारी दिवसभरात देण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांहून अधिक वय असलेल्यांना आतापर्यंत २ कोटी ३० लाख ११ हजार ७९३ बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८४ कोटी ९२ लाख ३९ हजार ९९५ डोस पैकी १५ कोटी ६७ लाख २२ हजार ७०१ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात आतापर्यंत ७८ कोटी ९१ लाख ६४ हजार ९२२ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ६ लाख ७ हजार ९८७ तपाासण्या बुधवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

देशातील बूस्टर डोसची स्थिती

श्रेणी बूस्टर डोस
१) आरोग्य कर्मचारी ४४,५५,५८२
२) फ्रंटलाईन वर्कर्स ६८,५८,३९७
३) ६० वर्षांहून अधिक १,१६,९७,८१४

हेही वाचा

Back to top button