धक्कादायक! दारू सोडण्याचे औषध जीवावर बेतले; दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर | पुढारी

धक्कादायक! दारू सोडण्याचे औषध जीवावर बेतले; दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : दारू सोडविण्याचे औषध पिऊन घरी आल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर दोघे अत्यवस्थ असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भद्रावती तालुक्यातील वडेगाव (गुडगाव) परिसरात मंगळवारी (दि.२१) घडली. अत्यवस्थ असलेल्या दोघांवर उपचार सुरू असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सहयोग सदाशिव जीवतोडे (वय १९ वर्ष) व प्रतीक घनश्याम दडमल (वय २६, दोघेही रा. गुळगाव असे मृत तरूणांचे नाव आहे.

भद्रावती तालुक्यातील वडेगाव (गुडगाव) येथील काही तरूण युवकांना दारूचे व्यसन आहे. गावातील चार तरूण मंगळवारी वर्धा  जिल्ह्यातील शेडेगाव येथे शेळके नावाच्या वैद्याकडे गेले होते. तेथे या चौघांनी दारू सोडविण्याचे औषध प्राशन केले. त्यानंतर घरी परत आल्यानंतर अचानक या चौघांची तब्बेत बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारासाठी नेत असताना वाटेतच सहयोग जीवतोडे व प्रतीक दडमल या दोघांचा मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भद्रावती पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.

हेही वाचा : 

Back to top button