चंद्रपूरच्या दीपकची लंडनच्या जागतिक आंबेडकराईट परिषदेत छाप

चंद्रपूरच्या दीपकची लंडनच्या जागतिक आंबेडकराईट परिषदेत छाप
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील निवासस्थानी 'जागतिक आंबेडकराईट परिषद' पार पडली. परिषदेत प्रमुख वक्ता म्हणून चंद्रपूरचे ॲड.दीपक यादवराव चटप उपस्थीत होते. यावेळी त्यांच्या पाथ फाऊंडेशन व पुण्यातील वोपा संस्थेने तयार केलेल्या 'आपले संविधान, आपली ओळख' या संविधानिक मोफत अभ्यासक्रमाची घोषणा व विमोचन करण्यात आले. परिषदेला भारत, फ्रान्‍स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन आदी देशांतील निवडक अभ्यासक उपस्थित होते.

ॲड. दीपक चटप हे चंद्रपूर जिल्ह्यातील लखमापूर या छोट्याशा गावातील आहेत. ते लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेत आहेत. त्यांना ब्रिटीश सरकारची चेव्हेनिंग ही जागतिक प्रतिष्ठेची ४५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. जागतिक आंबेडकराईट परिषदेत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आधुनिक भारतातील शिक्षण पद्धती' या विषयावर विचारमंथनासाठी त्यांना निमंत्रीत करण्यात आले होते.

'माझे संविधान माझी ओळख' मोफत अभ्यासक्रमाची घोषणा

पाथ फाउंडेशन व वोपा संस्थेने एकत्रित येत 'माझे संविधान माझी ओळख' हा अभ्यासक्रम तयार केला आहे. भारतातील शालेय विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्य, तरतुदी व महत्त्‍वाच्‍या कायद्यांची सोप्या भाषेत माहिती मिळावी, या उद्देशाने अभ्यासक्रम तयार केला आहे. अभ्यासक्रम प्रक्रियेत पाथ फाउंडेशनचे ॲड. बोधी रामटेके, ॲड. वैष्णव इंगोले यांना प्रतीक पानघाटे, मानस मानकर, आदित्य आवारी, इतिहास मेश्राम, संज्योत शिरसाट, नम्रता मेश्राम, श्रृष्टी गोसावी यांनी सहकार्य केले. पुणे येथील वोपा संस्थेचे प्रफुल्ल शशिकांत, राहुल बांगर, ऋतुजा जेव्हे, प्रतिमा कांबळे यांनीही मदत केली आहे. वोपाच्या व्ही-स्कूल ॲपवर मोफत अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

डॉ.बाबासाहेबांच्या लंडन येथील घरी जगभरातील अभ्यासकांसमोर पहिले भाषण देता आले, याचा मनस्वी आनंद आहे. डॉ.बाबासाहेबांची प्रेरणा घेवून संविधानातील मूल्यांची तळागाळात रुजवणूक व्हावी, यासाठी विशेष अभ्यासक्रमाचे लोकार्पण केले आहे. संविधानिक मूल्यांची जाणीव मनात रूजवत स्वतःच्या हक्कांसाठी जागृत असणारे विद्यार्थी हीच देशाची संपत्ती ठरेल.
– ॲड. दीपक यादवराव चटप, लंडन

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news