solar eclipse : खंडग्रास सूर्यग्रहण जाणून घ्या वेध आणि मोक्ष | पुढारी

solar eclipse : खंडग्रास सूर्यग्रहण जाणून घ्या वेध आणि मोक्ष

पुढारी ऑनलाइन डेस्क : solar eclipse : भारतात यंदा 25 ऑक्टोबरला मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण होत आहे. हे सूर्यग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तास्त दिसणार आहे म्हणजे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्तास जाईल. त्यामुळे भारतात कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही. म्हणून आपल्या गावाच्या स्पर्शकालापासून आपल्या गावाच्या सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा.

solar eclipse : ग्रहणाचा वेध – हे ग्रहण दिवसाच्या चौथ्या प्रहरात लागत असल्याने मंगळवारच्या पहाटे ३:३० पासून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा वेध पाळावा. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी १२:३० पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इ. करता येतील, तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजे ग्रहण स्पर्श ते सूर्यास्त या काळात (मुंबईकरिता दुपारी ४:४९ ते सायंकाळी ६:०८) पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत. (आपल्या गावच्या ग्रहणस्पर्श व मोक्ष वेळा पंचांगात पहाव्यात)

solar eclipse : या ग्रहणाचे वेध मंगळवारी पहाटे पासून असल्याने सोमवारी परंपरेप्रमाणे लक्ष्मीपूजन करून प्रसाद घेण्यास अडचण नाही. तसेच मंगळवारी सूर्यास्तानंतर वेध संपत असल्याने बुधवारी पहाटे दिवाळी पाडव्यानिमित्त केले जाणारे वहीपूजन देखील परंपरेप्रमाणे करता येईल. पाडव्यानिमित्त केले जाणारे सर्व धार्मिक उत्सव परंपरेप्रमाणे करता येतील. (अधिक माहिती पंचांगात पहावी.)

solar eclipse : यापूर्वी 1995 मध्ये याच प्रमाणे 23 ऑक्टोबर रोजी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन होते, 24 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होते. 25 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा आणि भाऊबीज आलेली होती. या नंतर 3 नोव्हेंबर 2032 मध्ये याच प्रमाणे दिवाळीमध्ये ग्रहण येणार आहे मात्र हे ग्रहण महाराष्ट्रातून दिसणार नाही, उत्तर भारतामध्ये दिसेल.

Life On Mars: मंगळावर सापडले सेंद्रिय पदार्थांचे नमुने; लालग्रहावरील जीवसृष्टीच्या ‘या’ असू शकतात पाऊलखुणा

Diwali and Health : दिवाळीत आरोग्‍याकडे दुर्लक्ष नको, ‘या’ टिप्‍स करतील तुम्‍हाला मदत

 

Back to top button