चंद्रपुर : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार | पुढारी

चंद्रपुर : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. या हल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना आज (दि.२२)   उघडकीस आली. सूर्यभान टिकले (वय ५५ रा. चिचाळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मुल तालुक्यातील ताडाळा येथील शेतकरी सूर्यभान टिकले हे आज (दि.२२) सकाळी सात वाजता शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. टिकले यांचे शेत जंगलाला लागून असल्याने येथे वाघ दबा धरून बसला होता. शेत पिकांची पाहणी करत असताना वाघाने टिकले यांच्यावर हल्ला केला.

यामध्ये टिकले यांचा जागीच मृत्यू झाला. बराच वेळ ते घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध केली असता, ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती गावात पसरताच लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. घटनास्थळी धाव घेत वनाधिकाऱ्यांनी मृत्तदेह ताब्यात घेतला. पावसाळ्याचे दिवसात अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर परिसरात तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button