सांगली : पलुसमध्ये नागोबा मंदिर जागेसाठी नाभिक समाजाचे मुंडण करून आंदोलन

सांगली : पलुसमध्ये नागोबा मंदिर जागेसाठी नाभिक समाजाचे मुंडण करून आंदोलन

पलूस; पुढारी वृत्तसेवा : कुंडल येथील नागोबा देवालयातील जागेवरील अतिक्रमणासंदर्भात पलूस तहसिलदार कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांचे आमरण उपोषण सुरु आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी सकारात्मक तोडगा न निघाल्याने पलूस तालुका नाभिक समाजाच्या वतीने तहासिलदार कार्यालयासमोर व जुना बस स्थानक चौकात मुंडण आंदोलन करण्यात आले. दोन दिवसात जागेसंदर्भात तोडगा न निघाल्यास जिल्हा बंद करण्याचा इशारा नाभिक समाजाच्या वतीने देण्यात आला. यावेळी तालुक्यातील संपुर्ण सलुन दुकाने बंद ठेऊन प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

कुंडलमध्ये राजकीय नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नाभिक समाजाला वेठीस धरण्याचे काम केले आहे. नाभिक समाजाच्या नागोबा मंदिराची जागा तात्काळ ताब्यात द्या अन्यथा येणाऱ्या दोन दिवसात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्ते संग्राम थोरबोले यांनी दिला.

तालुकाध्यक्ष प्रमोद झेंडे म्हणाले की, कुंडल येथील नागोबा मूर्ती ग्रामपंचायतने हलवून नाभिक समाजाच्या भावना दुखविण्याचे काम केले आहे . तसेच सिटी सर्व्हे ७८६ मध्ये अरुण लाड यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२२-२३ अंतर्गत नाभिक समाजा करिता सभागृह मंजूर केले मात्र या जागे शेजारील सिटी सर्व्हे ७८५ धनगर समाजाची जागा आहे. नाभिक समाजाचे मंजूर झालेले सभागूह बांधकाम करण्या करिता दोन्ही जागेची मोजणी होणे गरजेचे आहे. प्रशासन जागेची मोजणी करुन नागोबा ची जागा समाजाला द्यावी या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत प्रशासक,पलूस चे तहसिलदार तसेच पलूस च्या गट विकास अधिकारी यांना देणेत आले होते .मात्र त्यावर कोणतीही कारवाई अद्याप झाली नाही.

या आंदोलनात नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष प्रमोद झेंडे, संत सेना असोसिएशन सांगली शहर अध्यक्ष संतोष खंडागळे ,सेवा संघ सांगली अध्यक्ष अरुण साळुंखे, सांगली जिल्हा युवा अध्यक्ष श्याम जाधव, सेवा संघ उपाध्यक्ष रवी जाधव , प्रमोद शिरसागर, एकता फाउंडेशन जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड  संतोष साळुंखे ,जयवंत सूर्यवंशी ,विजय जाधव ,शशिकांत गायकवाड ,अनिल काशीद ,संतोष खंडागळे, विक्रम सूर्यवंशी ,विश्वनाथ सूर्यवंशी ,विश्वनाथ गायकवाड सहित नाभिक समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news