नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागाची तहान भागणार, करंजवण धरण ९८ टक्के भरले

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागाची तहान भागणार, करंजवण धरण ९८ टक्के भरले

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

पाऊस यंदा जिल्ह्यावर रुसला असला तरी दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सुरुवातीपासूनच अधुनमधून मध्यम व रिमझिम पाऊस पडल्यामुळे आजमितीस तालुक्यातील महत्वाची पाचही धरणे भरल्यामुळे शेतकरी वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. तालुक्यातील महत्वाचे करंजवण धरण ९८ टक्के भरले आहे, तर पुणेगाव धरण पहिल्यांदा भरले आहे. फक्त तीसगाव धरणाचा पाणीसाठा ४3 टक्के इतकाच आहे.

संबधित बातम्या :

तालुक्यात मागील काही वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी पहिल्यापासूनच तालुक्यात अतिशय कमी पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील धरणांच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या येवला, मनमाड, चांदवडसह निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा दिंडोरी तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्याकडे आहेत. दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे व उन्हाळ्यामध्ये येवला, मनमाड व निफाड तालुक्याच्या काही परिसराची शेतीसह पिण्याच्या पाण्याची तहान भागविणारे करंजवण धरण आजमितीस ९८ टक्के भरल्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच वणी शहर, दिंडोरी शहरासह चांदवड तालुक्यातील पाणी योजना व शेतीला कालव्यांव्दारे पाणीपुरवठा करणारे ओझरखेेड धरणही ९४ टक्के भरले आहे. वाघाड धरण मागील दोन दिवसाच्या पावसाने १०० टक्के भरले असून सांडव्यातून पाणी वाहत आहे. त्यात मांजरपाडा (देवसाने) प्रकल्प पुणेगाव, ओझरखेड धरणाला वरदानच ठरला आहे. मांजरपाडा प्रकल्पातून येणाऱ्या पाण्यामुळे तालुक्यातील पुणेगाव धरण (९७ टक्के) पहिल्यांदा भरले असून त्याच पाण्यावर ओझरखेड धरण ९४ टक्के भरले आहे. पालखेड धरणाची पाणीसाठ्याची क्षमता कमी आहे. हे धरण भरण्यास वेळ लागत नाही. आजही या धरणाचा पाणीसाठा ९८ टक्के इतका आहे. मात्र तालुक्यातील सर्व धरणाचे पाणी पालखेड धरणात जमा होऊन पुढे येवला मनमाड निफाड तालुक्याला सोडले जाते.

तीसगावसाठी हवा जोरदार पाऊस

दिंडोरी तालुक्याच्या पूर्व भागामध्ये अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे आजही तीसगाव धरणाचा पाणीसाठा ४3 टक्के इतकाच आहे. वळवाचा पाऊस कसा पडणार यावरच तीसगाव धरणाची मदार अवलंबून आहे. अजूबाजूच्या शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी तीसगाव धरण भरणे महत्वाचे समजले जाते. पंरतु येणाऱ्या काळात पाऊस कसा पडणार यावर या धरणाचे भवितव्य अवलंबून आहे.

दिंडोरी तालुक्यातील धरणसाठा

करंजवण 98%

पालखेड 98%

पुणेगाव 97%

वाघाड 100%

ओझरखेड 94%

तीसगाव 43%

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news