चंद्रपूर : घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू; पती, मुलगी गंभीर जखमी

चंद्रपूर : घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू; पती, मुलगी गंभीर जखमी
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात सतत दोन आठवडे कोसळलेल्या मुसळधार पावसाने घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. काही घरांची स्थिती तर धोकादायक झाली आहे. एका घराची भिंत कोसळून ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिचा पती व लहान मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. वनिता योगेश पुणेकर (वय ३६) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बल्लारपूर शहरातील मौलाना आझाद वार्डात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.

रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बल्लारपूर येथील मौलाना आझाद वॉर्डातील टेकडीभागात वनिता पुणेकर ही कुटुंबीयांसोबत घरी टीव्ही बघत होती. अचानक घराची भिंत कोसळली. वनिता भिंतीखाली दबल्या गेल्या. त्‍यांचा जागीच मृत्यू झाला. पती योगेश पुणेकर व लहान मुलगी गंभीर जखमी झाले. शेजारी व नागरिक धावून आले. तत्काळ जखमी पती व मुलीला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या दुर्देवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृत महिलेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. पती सिकलसेल आजारी असतात. घरच्‍या कमवित्या महिलेचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत महिलेच्या मागे पती, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news