आजही मातोश्रीचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले : आदित्य ठाकरे यांचे बंडखोर आमदारांना आवाहन | पुढारी

आजही मातोश्रीचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले : आदित्य ठाकरे यांचे बंडखोर आमदारांना आवाहन

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खूपसून चूक केली, असे ज्‍यांना वाटत असेल त्‍यांच्‍यासाठी  आजही मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, असे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज स्‍पष्‍ट केले.  सिंधुदुर्ग येथे शिवसेनेच्या शिवसंवाद यात्रेत ते बोलत होते.

एक दीड महिन्याचं नाटक, नंतर सरकार कोसळणार

यावेळी ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. दोन मंत्र्यांच जम्बो मंत्रीमंडळ आहे. मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण हेच कळत नाही. एक दीड महिन्याचं नाटक आहे, नंतर सरकार कोसळणार,असे भाकीतही यावेळी आदित्‍य यांनी केले.

हिम्मत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या

महाराष्ट्राचे तुकडे करू इच्छिणारे शिवसेनेचे तुकडे करू पाहताहेत. पण ठाकरे परिवाराला कोणीही संपवू शकत नाही. हिम्मत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणूकीला सामोरे या, असे आव्‍हान त्‍यांनी शिवसेनेच्‍या बंडखाेर आमदारांना केले.

सत्य जिंकते की सत्ता जिंकते ते कळू द्या. पण आजही ज्यांना वाटत असेल की, पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेला तोडायला नको होते, असे ज्या गद्दारांना वाटत असेल त्यांच्यासाठी आजही मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. पक्षप्रमुखांची चूक असेल तर मान्य करतो, पण पाठीमागून वार का केलात? असा सवालही  त्यांनी  यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा :

Back to top button