अमरावती : डोक्यावर प्रहार करून सराफ व्यावसायिकाची हत्या; तिवसा येथील घटना | पुढारी

अमरावती : डोक्यावर प्रहार करून सराफ व्यावसायिकाची हत्या; तिवसा येथील घटना

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : तिवसा येथे त्रिमूर्ती नगर येथील रहिवासी संजय भगवंत मंडळे (वय ५५) या सराफ व्यवसायिकाची राहत्या घरी निर्घूण हत्या करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि.२८) रात्री उघडकीस आली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय मंडळे हे सराफ व्यावसायिक असून तिवसा येथील त्रिमूर्ती नगरमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. सोमवारी त्यांच्या घरात त्यांचा मृतदेह रक्ताने भिजलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला.

संजय मंडळे यांचे तिवसा शहरातच त्यांचे ज्वेलरी शॉप आहे. सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास मंडळे यांचा मुलगा व पत्नी हे दोघे रुग्णालयात काम असल्यामुळे बाहेर गेले होते. घटनेनंतर घरातील सोन्याच्या दागिन्याची बॅग घरात आढळून न आल्यामुळे हा खून चोरीच्या प्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामीण पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button