Malti IVF Center Nashik | स्त्रीबीज तस्करीचे 'नाशिक कनेक्शन'! ठाणे पोलिसांचा पालिकेच्या पथकाला बदलापूर दौऱ्यासाठी तूर्त नकार

Malti IVF Center Nashik | पोलिसांकडून अद्यापही ग्रीन सिग्नल नाहीच
IVF
IVFPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्त्रीबीज तस्करी प्रकरणातील नाशिकशी संबंधित धागेदोरे हाती लागण्याची शक्यता गृहीत धरत नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने आखलेला बदलापूर दौऱ्याला ठाणे पोलिसांनी अद्यापही ग्रीन सिग्नल दिलेला नाही.

IVF
Ashok Kharat Case | नाशिकमध्ये खळबळ! ब्लॅकमेलर नीरज जाधव अद्याप फरार; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या प्रकरणात ठाणे पोलिसांना आणखी दोन आरोपींचा शोध लागणे बाकी असल्याने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत महापालिकेच्या पथकाला या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे देण्यास ठाणे पोलिसांनी तूर्त नकार कळविला आहे.

त्यामुळे महापलिकेच्या पथकाचा बदलापूर दौरा लांबणीवर पडला आहे. ठाण्यातील बदलापूर येथे स्त्रीबीज तस्करी प्रकरण उघडकीस आले. नाशिकमधील गोविंदनगर येथील मालती आयव्हीएफ केंद्राचा या स्त्रीबीज तस्करी प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे.

या केंद्राला नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे. नाशिकमधील या केंद्रामार्फत बदलापूर येथे स्त्रीबीज तस्करी केली जात असल्याचे तपासातून समोर आले आहे.

या प्रकरणानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने मालती आयव्हीएफ केंद्रातून वादग्रस्त कागदपत्रे ताब्यात घेतली असून, गेल्या महिन्यात या केंद्राची नोंदणी रद्द करण्यात आली.

IVF
Ashok Kharat Scam | देवदर्शनाच्या नावाखाली उघडली भक्तांची बनावट खाती

त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने पथकांची नियुक्ती करून शहरातील २४ केंद्रांची कागदपत्रे छाननी सुरू केली. बदलापूर येथील स्रीबीज तस्करीत किती महिलांची फसवणूक झाली, तस्करीची पद्धत काय? या संदर्भात बदलापूर पोलिसांकडे नाशिक महापालिकेचे पथक बदलापूर येथे जाणार होते; परंतु या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झाला नसल्याने ठाणे पोलिसांनी महापालिकेच्या पथकाला कागदपत्रे देण्यास नकार दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news