Nashik Kerosene Supply | ग्रामीण भागात केरोसिन वितरणाचा श्रीगणेशा

Nashik Kerosene Supply | पेठला पहिला टँकर रवाना, प्रतिकार्डवर तीन लिटर पुरवठा, ग्राहकांसाठी ६१ रुपये प्रतिलिटर दर निश्चित
kerosene supply
kerosene supply file photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात केरोसिन वितरणाचा शुभारंभझाला असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ येथे सोमवारी (दि. ६) पहिला टैंकर घाऊक वितरकाकडे पोहोचला आहे. इतर तालुक्यांमध्येही आता लवकरच केरोसिनचे टँकर पोहोचणार असून, लाभार्थ्यांना रेशनकार्डवर प्रतिकार्ड तीन लिटरप्रमाणे वितरण केले जाणार आहे. त्यासाठी दर निश्चित करण्यात आले आहेत.

kerosene supply
Malti IVF Center Nashik | स्त्रीबीज तस्करीचे 'नाशिक कनेक्शन'! ठाणे पोलिसांचा पालिकेच्या पथकाला बदलापूर दौऱ्यासाठी तूर्त नकार

आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोल-डिझेल सोबतच गॅसटंचाईही तीव्र झाली आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता शासनाने ग्रामीण भागात केरोसिन वितरणाचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला होता.

केंद्रशासनाने हिरवा कंदील देत जिल्ह्यातील मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार नाशिक जिल्ह्यासाठी २२८ किलोलिटर केरोसिन साठा मंजूर करण्यात आला आहे. तो मनमाड डेपोतून जिल्ह्यासाठी पुरविला जात आहे. दरम्यान, सोमवारी (दि. ६) पहिला केरोसिनचा टँकर पेठ येथे वितरित करण्यात आला आहे.

त्या माध्यमातून जिल्ह्यात आज केरोसिन वितरणाचा श्रीगणेशा झाला. आता त्याचे वितरण रेशन दुकानचालकांमार्फत प्रतिकार्ड तीन लिटरप्रमाणे वितरण केले जाणार आहे. त्यातून ग्रामस्थांना केरोसिन विक्रेत्याचा शोधाशोध करावे लागणार नाही. १२ हजार लिटरचा पहिला टैंकर रवाना केला आहे. तेथील तहसीलदार आता किरकोळ विक्रेत्यांना वितरित करतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात वितरण होईल

रॉकेल मिळाले मात्र टँकरची अडचण

दरम्यान, रॉकेल मिळाले मात्र ते घाऊक व अर्धघाऊक विक्रेत्यांना द्वारपोच करण्यासाठी टँकरच उपलब्ध नाही. शासनाने १९ टैंकरांना मंजुरी दिली आहे. मात्र, टँकर मिळणेही मुश्किल आहे. अशा परिस्थितीत पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी आपल्या संपर्काचा उपयोग करीत रायगड येथून खाली टैंकर मागविला व तो भरून आज पेठकडे रवाना केला.

kerosene supply
Nashik Water Crisis | नाशिकमध्ये निसर्गाचा विरोधाभास! कुठे अवकाळीचा तडाखा, तर कुठे 98 गावांना पाणीटंचाईचा चटका

दर निश्चित

दरम्यान, केरोसिनचे दर निश्चित करण्यात आले आहे. त्यात घाऊक विक्रेत्यांसाठी ६० हजार ५०४ प्रति कि. लि. निश्चित करण्यात आला आहे. तर किरकोळ विक्रीसाठी ६० हजार ६५० प्रति कि.लि. दर निश्चित करण्यात आला आहे. त्यात जीएसटी, वाहतूक खर्च व वितरकांचे कमिशनचा समावेश आहे. साधारण प्रतिलिटर ६१ रुपये या दराने लाभार्थ्यांना त्याचे वितरण होणार आहे.

वितरणात सुसूत्रता यावी, लाभार्थ्यांना पुरेपूर लाभदेता यावा म्हणून रेशन दुकानांमधून केरोसिन वितरण केले जाणार आहे. टँकरची अडचणही लवकरच दूर करून सर्व ग्रामीण तालुके व गावांना केरोसिन पुरवठा करू.

- रमेश गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news