वर्धा : नियमोल्लंघन करत वाळू उपसासह वाहतूक, दोन कोटींचा मुद्देमाल जप्त, २३ जणांना अटक | पुढारी

वर्धा : नियमोल्लंघन करत वाळू उपसासह वाहतूक, दोन कोटींचा मुद्देमाल जप्त, २३ जणांना अटक

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : नियमांचे उल्लंघन करत वाळू उपसासह वाहतूक करणाऱ्यांवर पुलगाव लगतच्या सालफळ घाटामध्ये  कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दहा ट्रक एक जेसीबी चारचाकी वाहने आदी 2 कोटी 15 लाख 94,500 मुद्देमाल जप्त केला.
सालफळ शिवारात वाळू घाटामध्ये जेसीबीने अवैधरीच्या वाळूचे उत्खनन करून टिप्परमध्ये भरल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलिसांनी वाळू घाटात छापा टाकला. तिथे जेसीबीच्या साह्याने टिप्परमध्ये वाळू भरताना आढळून आले. घटनास्थळी दहा टिप्पर होते. त्यातील 8 टिप्पर मध्ये वाळू भरलेली आढळून आली. रात्रीच्या सुमारास वाळू वाहतूक, साठवणुकीचा परवाना नव्हता. पोलिसांनी एक जेसीबी 10 टिप्पर चार चार चाकी वाहने मोपेड रोख 72 हजार २२ मोबाईल असा दोन कोटी १५ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी 23आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनात पुलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाणबले पोलीस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर राजू सोनपितरे, पोलीस उपनिरीक्षक घनशाम जाधव सुधीर गुळकर रितेश गुजर असं दराडे शुभम कावडे प्रणय इंगोले आणि पोलीस मुख्यालयातील पथकाने केली.

Back to top button