नागपूर : खाद्य तेलाचे रिपॅकेजिंग; दोन ठिकाणी धाडी, साडेचार लाखांचा साठा जप्त | पुढारी

नागपूर : खाद्य तेलाचे रिपॅकेजिंग; दोन ठिकाणी धाडी, साडेचार लाखांचा साठा जप्त

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहरातील खाद्यतेल रिपॅकिंग करीत असलेल्या दोन आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासन, नागपूर या कार्यालयाकडून अचानक धाडी टाकून कारवाई करण्यात आली.

अन्न सुरक्षा अधिकारी पी. व्ही. मानवतकर यांनी “रिफाईड सोयाबीन तेल” व “रिफाईड पामोलीन तेल” या अन्नपदार्थाचे नमूने घेऊन उर्वरित खाद्यतेलाचा 4 लाख 23 हजार 190 रुपये किंमतीचा 3 हजार 445.2 किलो साठा भेसळीच्या संशयावरून जप्त केला. अन्न नमुने, अन्न प्रयोगशाळा येथे विश्लेषणाकरीता पाठविण्यात आलेले असून, या प्रकरणी विश्लेषण अहवाल प्राप्त होताच, त्यानुषंगाने तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तपासणी अहवालाच्या अनुषंगाने एका आस्थापनेस अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्या अंतर्गत नियम व नियमन मधील कलम 32 अन्वये सुधारणा नोटीस पाठविण्यात आली असून एका आस्थापनेस विना परवाना व्यवसाय करीत असल्यामूळे, अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली.

ही कारवाई सह आयुक्त (अन्न) कृ. रं. जयपुरकर व सहायक आयुक्त (अन्न) प्र. म. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी पी. व्ही. मानवतकर यांनी केली.

Back to top button