बायकोनं नवऱ्याला १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करायला लावले ! | पुढारी

बायकोनं नवऱ्याला १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करायला लावले !

वर्धा; पुढारी वृत्तसेवा

पत्नीने पतीला १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करायला लावल्याची घटना वर्धा जिल्ह्यात उघडकीस आली. आर्वी पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या एका गावात ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आरोपी दाम्पत्यास अटक केली. या दाम्पत्याला ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आर्वी पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या एका गावात महिलेने अल्पवयीन मुलीला घरी बोलावून आणले. आरोपी महिलेने पीडित मुलीला पतीसोबत लग्न कर असे म्हणत घराचा दरवाजा बंद करून बाहेर निघून गेली. यावेळी पतीने पीडित मुलीसोबत अत्याचार केला. थोड्या वेळानंतर पत्नी घरी परत आली.

त्यावेळी पत्नीने पतीला पुन्हा बळजबरीने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लावले. दोघांनीही पीडितेला ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींच्या तावडीतून सुटल्यानंतर घरी पोहोचल्यानंतर पीडितेने या प्रकाराची माहिती कुटुंबियांना सांगितली. याप्रकरणी आर्वी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी दाम्पत्याविरूद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button