कोल्हापूर अनलॉक : सर्व दुकाने सोमवार पासून उघडणार | पुढारी

कोल्हापूर अनलॉक : सर्व दुकाने सोमवार पासून उघडणार

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर मधील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय आज ( दि. १७ ) रोजी जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा आदेश काही वेळापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला.

या आदेशानुसार सोमवार  ( दि. १९ ) पासून जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ही मुभा सोमवार ते शुक्रवार पर्यंतच लागू असणार आहे. त्यानंतर शनिवार रविवार हे विकेंड लॉकडाऊनचे दिवस असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील.

कोल्हापुरात निर्बंध स्तर ३ मधील नियम हे सोमवार दि. १९ पहाटे ५ वाजल्यापासून लागू होतील. हे नियम पुढील आदेश मिळेपर्यंत लागू राहणार आहेत.

अधिक वाचा : 

तीन महिन्यापासून व्यवहार होत बंद

कोल्हापुराती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट हा १० च्या आसपास घुटमळत होता. कोल्हापूर कोरोना निर्बंधाबाबतच्या चौथ्या स्तरात होता.

त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. गेल्या तीन, साडेतीन महिन्यापासून व्यवहार बंद असल्याने व्यापारी वर्गाताही निराशेचे वातावरण निर्माण झाले होते.

राज्यातील अनेक जिल्हे तिसऱ्या स्तरात असल्याने तिथले व्यवहार सुरु झाले. मात्र कोल्हापूर काही केल्या तिसऱ्या स्तरात येत नव्हते. व्यापाऱ्यांनही शासनाच्या धोरणावर टीका करत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.

मध्यंतरी पाच दिवसांसाठी सर्व व्यवहार सुरु करुन प्रशासनाने त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.

अधिक वाचा : 

पॉझिटिव्हिटी रेटने दिलासा दिला

मात्र त्यानंतर पुन्हा कोल्हापूर मूळ पदावर आले आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. आता मात्र प्रशासनाने व्यापारी वर्गाला मोठा दिलासा दिला. गेल्या दोन दिवसापासूनच कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट ७ च्या आसपास असल्याने आशेचे चित्र निर्माण झाले होते.

सोमवारपासून सर्व व्यवहार सुरु होतील अशी चर्चा सुरु झाली होती. अखेर आज प्रशासनाने आदेश काढून सोमवारपासून सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु करण्यास परवानगी दिली.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : कोल्हापुरात आदिमानवाच्या अस्तित्वाचे पुरावे

Back to top button