ST workers : वाशिममधील १२४ एसटी कर्मचारी निलंबित | पुढारी

ST workers : वाशिममधील १२४ एसटी कर्मचारी निलंबित

वाशिम; पुढारी वृत्तसेवा

वाशिम जिल्ह्यात गेल्या 22 दिवसांपासून एस.टी.महामंडळ कर्मचाऱ्याचे विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलन स्थगित करण्यासाठी शासनाने पगारवाढ करत, परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले होते. तरीही वाशिम जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते.परिणामी महामंडळाने आज कठोर निर्णय घेत महामंडळाच्या ८५ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. (ST workers ) यामध्ये कारंजा २०, मंगरुळपिर २०, रिसोड २० आणि वाशिम आगारातील २५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

संप सुरूच ठेवणार

यापूर्वी जिल्ह्यातील ३९ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ९५० कर्मचाऱ्यांपैकी १२४ कर्मच्याऱ्यांचे निलंबन झाले आहे. (ST workers)जिल्ह्यातील सर्व कर्मचारी निलंबित झाले तरी चालतील मात्र जोपर्यंत आमचं शासनात विलानीकरण होत नाही. तोपर्यंत आम्ही संप सुरूच ठेवणार असल्याचं यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचलं का?

Back to top button