khanapur S T strike : खानापुरात एस टी बसेस फोडल्या, दोघांवर गुन्हे दाखल | पुढारी

khanapur S T strike : खानापुरात एस टी बसेस फोडल्या, दोघांवर गुन्हे दाखल

विटा : पुढारी वृत्तसेवा : khanapur S T strike : खानापूरात एस टी बसेस फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हh दाखल करण्यात आले आहेत. खानापूर तालुक्यात एस. टी. महामंडळाच्या दोन बस फोडल्याप्रकरणी दोघांना खानापूर पोलिसांनी अटक केली. गणेश जगन्नाथ कदम (रा. भडकेवाडी,ता. खानापूर) आणि पवन गणपत भवर (रा. विजयनगर,ता. तासगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

नुकतेच एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एस. टी. बंद आंदोलन करत संप पुकारला होता. सरकारने पगारवाढीची घाेषणा केल्‍यानंतर काही कर्मचारी सपातून माघार घेत पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. तर काही जण अद्यापही संपात सहभागी आहेत.

khanapur S T strike : संपकऱ्यांच्या फूटीचा मोठा परिणाम

परिणामी संपकऱ्यांमध्ये फूट पडली आहे. यातूनच आता संप करणारे आणि कामावर आलेल्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.मात्र याचा गैरफायदा काही समाजकंटक लोक घेताना दिसत आहेत.

शनिवारी दोन वेगवेगळ्या घटनेत विटा आगाराच्या तासगाव ते खानापूर (गाडी नंबर एम एच२० – BL ११४२) आणि विटा ते भिवघाट (गाडी नंबर ४०एन ८५९४) या दोन गाड्यांच्या काचा गणेश जगन्नाथ कदम आणि पवन गणपत भवर दोघांनी फोडल्या.

प्रवाशांच्या मदतीने दोघांना पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

चालक आणि वाहक तसेच प्रवाशांच्या मदतीने या दोघांना पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जे. ए. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी एल. एम.गुरव, एम व्ही खिलारे, एस डी खुबीकर, एम. टी. कांबळे यांनी कारवाई केली.

हेही वाचलं का?

Back to top button