Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसचा त्याच्या बरोबरचा 'हा' फोटो होतोय व्हायरल | पुढारी

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसचा त्याच्या बरोबरचा 'हा' फोटो होतोय व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री  जॅकलीन फर्नांडिस अलिकडच्या काही दिवसात (Jacqueline Fernandez)  मनी
लॉड्रिंग प्रकरणामुळे (
Money Laundering Case) वादाच्‍या भाेवर्‍यात सापडली होती. ती आता पुन्हा एकदा एका एका फोटोमूळे चर्चेत आली आहे. फसवणूक प्रकरणातील संशयित आराेपी सुकेश  चंद्रशेखरबराेबरील तिचा फाेटाे व्‍हायरल झाला आहे.

सुकेश चंद्रशेखर बरोबर रोमॅंटिक फोटो 

जॅकलीन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर (Money Laundering Case) यांचा एक फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अशी अफवा पसरत आहे की, जॅकलीन फर्नांडिस ही सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याला डेट करत आहे. 

(Sukesh Chandrasekhar) कोण आहे सुकेश चंद्रशेखर?

सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) आणि त्याची पत्नी मॉडेल मारिया पॉलवर २०० करोडोंचा फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. गेल्या काही महिन्यांपासून जॅकलीनच्या आर्थिक व्‍यवहारांवर ईडीची नजर आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी तिची चाैकशी केली हाेती. यावेळी तिने सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याच्‍याबाबत काेणतीही माहिती नसल्‍याचे म्‍हटलं हाेते.

सुकेशने जॅकलीनला महागडे गिफ्ट आणि गाडी दिली आहेत. दोघे डेट करत आहेत, अशा अफवा  मागील काही दिवसांपासून जोरदार सुरू आहेत. पण यामध्‍ये काेणतेही तथ्‍य नसल्‍याचा दावा जॅकलीनने केला हाेता. मात्र आता या दाेघांना रोमॅंटिक फोटो व्‍हायरल झाल्‍याने त्‍यांच्‍या नाात्‍याची पुन्हा चर्चेला सुरु झाली आहे.

Jacqueline Fernandez

मनीलॉड्रिंग प्रकरणामूळे चर्चेत आलेली जॅकलीन आपल्या फिटनेस बाबतीत खूप सतर्क असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.  वेगवेगळ्या अंदाजातील फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेही वाचलतं का? 

Back to top button