छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या : तरुणाच्‍या सुसाईड नोटमध्ये सासू-सासऱ्याचे नाव | पुढारी

छळाला कंटाळून जावयाची आत्महत्या : तरुणाच्‍या सुसाईड नोटमध्ये सासू-सासऱ्याचे नाव

जळगाव, पुढारी वृत्तसेवा

जळगाव मधील शिरसोली येथील ३२ वर्षीय तरुणाने सासू- सासऱ्याच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळीउघडकीस आली. त्‍याने व्हॉट्स अपवर आत्महत्येचा स्टेटस ठेवला होता. स्टेटसची वेळ लक्षात घेता, त्याने पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्‍याने एकच खळबळ उडाली आहे.अमोल प्रकाश धनगर (वय ३२, रा. अशोकनगर, शिरसोली प्र. न.) असे मृत तरुणाचे नाव आहे.

अमोल हा बकरी विक्री व्यवसाय करत होता. त्यातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. शिरसोली जळके रोडवरील भोलेनाथ नगरमधील बकऱ्यांच्या शेडमध्येच तो रोज रात्री झोपायला जात असे. शनिवारी रात्री त्याने वडील प्रकाश धनगर यांना शेडमध्ये झोपण्यास पाठवले. तो घरी झोपला. रविवारी सकाळी ६:३० वाजता वडील प्रकाश धनगर हे घरी आले. आणि अमोलने छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर गल्लीतील लोक त्यांच्या घरी आले.

पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. अमोलच्या खिशात सुसाईड नोट आढळली. त्यामध्ये त्याने सासू- सासऱ्यांच्या धमक्या व छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी पत्नी, वडील, भाऊ असा परिवारआहे. अमोलची पत्नी एक ते दीड महिन्यापासून मुलांना घेऊन माहेरी गेली आहे.

काय म्हटले आहे सुसाईड नोट मध्ये ?

आज मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. कारण माझी सासूबाई आणि सासरा मला फार त्रास देतात आणि फोन वरती धमकी देतात. म्हणून मी माझी जीवन यात्रा संपवत आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करा, ही नम्र विनंती.
माझा बकरीचा व्यवसाय आहे. त्या बकऱ्या विकून जे पैसे येतील ते पैसे माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या नावावर टाकावे. जेणेकरून त्यांना पुढे काही अडचण येणार नाही, ही माझी शेवटची इच्छा आहे., असेही त्‍याने सुसाईड नाेटमध्‍ये लिहले आहे.

हेही वाचलं का? :

Back to top button