कोल्हापूर विधानपरिषद : धनंजय महाडिक म्हणाले, 'म्हणून' आम्ही माघार घेतली ! (video) | पुढारी

कोल्हापूर विधानपरिषद : धनंजय महाडिक म्हणाले, 'म्हणून' आम्ही माघार घेतली ! (video)

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन

फक्त कोल्हापूर जिल्हा नव्हेच, तर राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने एकच चर्चा रंगली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची विधान परिषदेवर बिनविरोध वर्णी लागली आहे.

भाजपकडून रिंगणात उतरलेल्या अमल महाडिक यांनी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी पक्षादेश पाळल्याचे सांगितले. माजी खासदार आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी निवडणुकीत माघार का घेतली याबाबत खुलासा केला आहे.

ते म्हणाले की, आगामी कालखंडात राज्यात अनेक निवडणूका होत आहेत. त्यामुळे राज्यात सलोखा राहावा यासाठी विरोधी देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी या दृष्टीकोनातून चर्चा झाली आणि त्यानुसार निर्णय झाला आहे.

मुंबई भाजपसाठी महत्वाची जागा होती ती भाजपला मिळाली आहे. धुळ्याची जागा सुद्धा बिनविरोध व्हावी ही मागणी भाजप नेत्यांनी केली होती. आम्हाला दोन जागा पदरात पडल्या आहेत. त्याबदलात कोल्हापूरची जागा बिनविरोध झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून झालेल्या निर्णयाची माहिती दिली. महादेवराव महाडिक यांनाही फोन करून फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

यावेळी पाठिंबा दिलेल्या सर्वांचे धनंजय महाडिक यांनी विनय कोरे, प्रकाश आव्हाडे, सुरेश हळवणकर तसेच इतरांचे आभार मानले. पक्षादेश पाळून आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात महाडिक गटाचे वर्चस्व होते आहे आणि राहणार आहे. आम्ही पक्षासोबत असल्याने आदेश मानणे क्रमप्राप्त आहे. भविष्यात पक्ष सांगतील त्याप्रमाणेच वाटचाल असेही त्यांनी नमूद केले.

हे ही वाचलं का?

Back to top button