Urmila Purandare : जयसिंगपूरची लेक झाली अमेरिकेत नगरसेविका, पहिल्यांदाच भारतीय व्यक्तीला मान

Urmila Purandare : जयसिंगपूरची लेक झाली अमेरिकेत नगरसेविका, पहिल्यांदाच भारतीय व्यक्तीला मान
Published on
Updated on

अमेरिकेतील न्यू जर्सी भागात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदीय निवडणुकीत होपवेल टाउनशिपमध्ये नगरसेविका (councillor) म्हणून जयसिंगपूरची कन्या उर्मिला जनार्दन अर्जुनवाडकर (सौ. उर्मिला अशोक पुरंदरे) निवडून आल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार एडवर्ड एम. जॅकोवस्की यांचा एक हजाराच्या मतांनी पराभव केला. होपवेल टाऊनशिपच्या तीनशे वर्षाच्या इतिहासात भारतीय वंशाची पहिलीच नगरसेविका होण्याचा मानही उर्मिला (Urmila Purandare) यांनी पटकावला आहे.

उर्मिला जनार्दन अर्जुनवाडकर ह्या येथील चौथ्या गल्लीतील विजया व जनार्दन दामोदर अर्जुनवाडकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे शिक्षण जयसिंगपूरमध्ये बी वॉर्ड शाळा, जयसिंगपूर हायस्कूल व जयसिंगपूर कॉलेज येथे झाले. त्यांनी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सध्या त्यांचे वास्तव्य अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यांतील होपवेल येथे असून त्या एका औषध निर्मिती कंपनीत गेली 25 वर्षं शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

न्यू जर्सी येथे त्यांनी महाराष्ट्रीयन, भारतीय संस्कृती, परंपरा, मराठी भाषा जतन, संवर्धनासाठी मराठी शाळा आणि संस्कार वर्गांची सुरुवात केली. तसेच त्यांच्याकडे गणपती उत्सव गेली 25 वर्षं मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गर्ल स्काउट्स-लीडर, पालक शिक्षक संघटना पदाधिकारी, होपवेल व्हॅली फूड पँट्री आणि ए टू झेड मार्गदर्शन उपक्रम या स्थानिक संस्थानच्या कार्यांत त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांची झोनिंग व ऍडजस्टमेंट बोर्डवर सहाय्यक सदस्य म्हणून नेमणूक केली गेली. सहा वर्षांपासून टाउनशिपच्या समस्या आणि प्रशासनाचे काम त्या पाहत आहेत.

त्यामुळे त्यांना टाउनशिपच्या समस्या आणि प्रशासनाचे विस्तृत ज्ञान व सखोल जाण निर्माण झाली आहे. त्यातूनच त्यांना या निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या निवडणुकीत दैदिप्यमान यश मिळवून जयसिंगपूरचा आणि भारताचा झेंडा फडकवला. त्यांना या निवडणुकीत 3701 मते मिळाली. त्यांच्या कामगिरीचे अमेरिकेत विविध स्तरावर कौतुक होत आहे. त्यांचा शपथविधी कार्यक्रम जानेवारीमध्ये होणार आहे.

Urmila Purandare : जयसिंगपुरातही प्रतिनिधित्व…

जयसिंपूरमध्ये असताना देखील विविध क्रीडा व सामाजिक कार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असे. त्यांनी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरचे विद्यार्थिनी प्रमुखपदही भूषविले आहे. विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय स्पर्धेत त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या टेबल टेनिस संघात निवड झाली होती व सांघिक सुवर्ण पदकही जिंकले होते.

माझ्या यशामध्ये पती अशोक पुरंदरे, मुलगा रोहित व मुलगी राधिका यांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर जयसिंगपूर नगरीत झालेल्या जडणघडणीत कुटुंबियांचा, स्थानिक सहकार्‍यांचा व मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळेच मी भारतीय असून सुध्दा हा बहुमान मिळाला.
-उर्मिला पुरंदरे, अमेरिका

हे ही वाचा  :

पहा व्हिडिओ : उसावर भारी पडतेय पेरूची बाग : कागलच्या शिवराज साळोखे यांची ३ एकरात फुलवली बाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news