Chandrapur : चंद्रपुरात ३० नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी | पुढारी

Chandrapur : चंद्रपुरात ३० नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर ( Chandrapur )  जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. दि. १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१)(३) आदेश लागू करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शस्त्रबंदी व जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेशान्वये चंद्रपूर ( Chandrapur )  जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा व्यक्तीस शस्त्रे वापरता येणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक किंवा जाहीरपणे असभ्य वर्तन करता येणार नाही.

या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये. तसेच पोलिस अधीक्षक, चंद्रपूर यांनी सादर केलेला अहवाल पाहता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलिसांना मदत व्हावी. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) लागू करण्यात आला असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचलं का?

Back to top button