RSS Shastra Pooja
RSS Shastra Pooja

RSS Shastra Pooja : नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शस्त्रपूजा

Published on
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महानगरचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव आज (दि.२४) सकाळी रेशीमबाग येथे पार पडला. याप्रसंगी  प्रसिद्ध संगीतकार व गायक  शंकर महादेवन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहीले होते. जी२० मध्ये भारताने केलेल्‍या आदरातीथ्‍याचं जगभर कौतुक होत आहे अशी भावना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित असताना व्यक्‍त केली. (RSS Shastra Pooja)

RSS Shastra Pooja : गायक-संगीतकार शंकर महादेवन प्रमुख पाहुणे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरआरएस) वार्षिक विजयादशमी उत्सव कार्यक्रमाची सुरुवात आज (दि.२४) नागपूर येथे पथ संचलनाने झाली. यंदाच्या दसरा समारंभाला गायक आणि संगितकार असेलेले शंकर महादेवन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असताना त्यांनी  सर्वांना विडयदशमीच्या शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाला प्रुमुख पाहूणे म्हणून बोलवले बदद्ल संघ प्रमुखांचे आभार मानले. याप्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत संस्थेच संस्थापक के.बी.हेडगेवार यांना आदरांजली वाहिली. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनीही 'विजयादशमी उत्सवा'निमित्त 'शास्त्रपूजा' केली.या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.

आपली अर्थव्यवस्‍थाही वेगाने पुढे जात आहे…

आपला देश सर्व क्षेत्रात पुढे चालला आहे. आपली अर्थव्यवस्‍थाही वेगाने पुढे जात आहे. टेक्‍नॉलॉजी, कृषी तसेच अनेक क्षेत्रातही मोठी प्रगती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश अव्वल स्‍थानी पोहोचला आहे. जी२० मध्ये भारताने केलेल्‍या आदरातीथ्‍याचं जगभर कौतुक होत आहे अशी भावना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्‍त केली. आज नागपुरात राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्‍या प्रसंगी ते बोलत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news