

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : st strike : ऐन दिवाळीच्या तोंडावर संपात सहभागी झालेल्या भंडारा एसटी विभागातील ३० कर्मचा-यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. राज्य पातळीवरुन निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत.
एसटी कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने कर्मचा-यांनी आपला संप सुरूच ठेवला आहे. परिणामी, एसटीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून प्रवाशांनाही आर्थिक आणि शारिरीक मनस्ताप सहन करावा लागत आहे. संप मागे घेण्यासाठी वारंवार सूचना देऊनही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने राज्य शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा विभागातील ३० कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये तुमसर, तिरोडा आणि गोंदिया आगारातील प्रत्येकी १० कर्मचा-यांचा समावेश आहे. राज्य पातळीवरुनच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या १२ दिवसांपासून भंडारा एसटी विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागील आठ-दहा दिवसांपासून एस.टी.महामंडळातील कर्मचार्यांचा संप सुरू असून बसेस बंद असल्यामुळे महामंडळाला कोट्यवधी रूपयांचा फटका बसला आहे.संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांना निलंबित करण्यात निर्णय विभागीय कार्यालयाने घेतला असून जिल्हयातील 58 कर्मचार्यांना निलंबित करण्यातआले आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अमित माळी यांनी दिली आहे.
महाराष्ट एस.टी.कर्मचारी संयुक्त कृती समितीने 31 ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला आहे, त्यामुळे बससेवेवर परिणाम झाला असून बसची चाके थांबली आहेत.या आंदोलनामुळे नांदेड विभागीय कार्यालयाला 6 ते 7 कोटी रूपयांचा फटका बसला आहे.जिल्ह्यातील सर्व आगारासह विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
मागील दहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून अद्यापपर्यंत हे आंदोलन मागे घेण्यात आले नाही,त्यामुळे नांदेड विभागीय कार्यालयाने निलंबनाचे हत्यार उपसले असून मंगळवार दि.9 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 58 कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे, याबाबतचे आदेश विभागीय वाहतूक अधिक्षकांनी काढले आहेत. यामध्ये 15 चालक, 29 वाहकांसह कार्यशाळेतील 13 तर विभागीय कार्यालयातील एका कर्मचार्याचा समावेश आहे.
एकाचवेळी 58 कर्मचार्यांना निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ असून.या निलंबनास्त्रामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र रूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळ कडून जिल्ह्यातील सुमारे ५० ते ६० एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसापासून एसटी कर्मचारी संप केला आहे. यामध्ये आटपाडी आगार अग्रेसर होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विटा, जत, इस्लामपूर आणि शिराळा इत्यादी आगार बंद झाले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संपात सांगली, मिरज आगारा सह जिल्ह्यातील सर्व आगार सहभागी झाले होते. ऐन दिवाळीत संप करून प्रवाशांची गैरसोय करू नये अशा नोटिसा महामंडळाकडून एसटी कर्मचारी देण्यात आल्या होत्या. परंतु कर्मचारी संप केला होता. यावर कारवाई म्हणून महामंडळाकडून सांगली विभागातील सुमारे 40 ते 50 एसटी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.