पैठण तालुक्यात हिस्त्र प्राण्यांची दहशत, वासराचा फडशा पाडला | पुढारी

पैठण तालुक्यात हिस्त्र प्राण्यांची दहशत, वासराचा फडशा पाडला

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यात मागील वर्षी आपेगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून दोन जणाचा प्राण घेतला होता. आता मात्र, पुन्हा एकदा या परिसरातील शुंगारवाडी, सोलनपूर, आंनदपूर, ज्ञानेश्वर वाडी, आपेगाव येथे सोमवारी रोजी रात्री हिस्त्र प्राण्यांनी धुमाकूळ घालून वासराचा फडशा पाडला आहे. यामुळे परिसरातील शेती वस्तीवर पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाचे अधिकारी या घटनास्थळी दाखल झाले आहे.

अधिक माहिती अशी की, मागील वर्षी नरभक्षक बिबट्याने पाचोड, बालानगर, विहामांडवा, वडवाळी जेरबंद थेरगाव, नांदर, राहाटगाव, नवगाव, तुळजापूर येथील परिसरातील शेती वस्तीवर धुमाकूळ घातला होता. १६ नोव्हेंबर २०२० रोजी आपेगाव परिसरातील शेतात काम करणाऱ्या अशोक औटे व कृष्णा औटे या पिता पुत्रावर हल्ला करून ठार केले होते.

यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या तज्ज्ञांनी दोन महिने या भागामध्ये ग्रस्त सुरू ठेवून अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते.

किरीट सोमय्या यांच्या विरोधात नागपूर कोर्टात याचिका दाखल

परंतु, पुन्हा एकदा सोमवारी रात्री या परिसरातील शूंगांरवाडी येथील गोविंद बद्रीनाथ खराद यांच्या शेती वस्तीवर अज्ञात हिस्त्र प्राण्यांनी हल्ला करून वासराचा फडशा पाडला. त्यामुळे वन विभागाची अधिकारी राजू जाधव आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करत आहेत. या परिसरातील जमिनीवर अज्ञात प्राण्याच्या पायाचे ठसे घेण्याचे काम सुरू आहे.

वरिष्ठ विभागाच्या अहवालानुसार हा प्राणी कुठल्या प्रकारचा आहे याची माहिती घेणार आहे. अशी माहिती वनरक्षक राजू जाधव यांनी ‘दैनिक पुढारी’ शी बोलताना दिली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button