st employees strike: संपावर असतानाही एसटी कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान | पुढारी

st employees strike: संपावर असतानाही एसटी कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : st employees strike : एकीकडे परिवहन महामंडळातील अनेक कर्मचारी आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करीत असताना गडचिरोली आगारातील संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आज स्वेच्छेने रक्तदान करुन सामाजिक बांधिलकीचा परिचय करुन दिला. या शिबिरात सुमारे ३६ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. आर्थिक विवंचनेतून अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत. अशाही स्थितीत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लढा सुरुच असताना गडचिरोलीतील एसटी कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी विभागीय नियंत्रक संजय सुर्वे, विभागीय वाहतूक अधिकारी वाडिभस्मे, आगारप्रमुख मंगेश पांडे, वाहतूक नियंत्रक एल.बी.चौधरी, राजरत्न पेटकर, किशोर देशमुख, नारायण फड यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button