मन उडू उडू झालं : अभिनेता अजिंक्य राऊत याच्या गाडीला अपघात | पुढारी

मन उडू उडू झालं : अभिनेता अजिंक्य राऊत याच्या गाडीला अपघात

पुढारी ऑनलाईन :

मन उडू उडू झालं या मालिकेतील अभिनेता अजिंक्य राऊतच्या गाडीचा अपघात झाला. या मालिकेत अजिंक्य राऊत याने इंद्राची भूमिका साकारलीय. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. या अपघाताविषयी अजिंक्यने एक व्हिडिओ पोस्ट शेअर केला आहे.

त्याने आपल्या गाडीला अपघात झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिलीय. सर्वजण सुखरुप असल्याचे समजल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. त्याने सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही पोस्टमधून केले आहे.

टीव्हीवरील ‘मन उडू उडू झालं’ मालिका सध्या चर्चेत आहे. ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेत अजिंक्यची इंद्राची भूमिका आहे तर ऋताची दीपू ही भूमिका आहे.

अजिंक्य म्हणतो की, नमस्कार मी अजिंक्य राऊत, आपण सर्वांनी दिवाळी साजरी केली. दरवर्षी दिवाळीला एखादा दिवस तरी मी परभणीला जातो. यंदा देखील मी ठाण्याहून परभणीला जात असताना रस्त्यात माझ्या गाडीचा अपघात झाला. सुदैवाने सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी सुखरुप आहे.

अपघातानंतर अजिंक्य बेशुद्ध झाला. शुद्धीवर आल्यानंतर त्याने हा व्हिडिओ शूट केला आहे. त्याने सर्वांनाही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्याने आपण सुखरु असल्याचे सांगत देवाचे आणि चाहत्याचे आभार मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajinkya Raut (@ajinkyathoughts)

Back to top button