Nagpur Flood : पुरात अडकलेल्या ३४९ जणांना सुखरुप बाहेर काढले

Nagpur Flood : पुरात अडकलेल्या ३४९ जणांना सुखरुप बाहेर काढले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील सखल भागात हाहाकार माजला आहे. आज (दि.२३) दुपारपर्यंत पुराच्‍या पाण्‍यात अडकलेल्‍या ३४९ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सकाळपासून पावसाने उघडीप दिल्‍याने मदत कार्याला वेग आला आहे. ( Nagpur flood)

संबंधित बातम्‍या :

नागपूरमध्‍ये 'एसडीआरएफ'च्या २ तुकड्या ७ गटात विभागण्यात आल्या आहेत. सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. आतापर्यंत एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमने ३४९ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मूक-बधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले .

 Nagpur flood : 'एनडीआरएफ'सह लष्‍कराच्‍या दोन तुकड्या मदतकार्यात

नागपूर शहराच्या विविध भागात एनडीआरएफच्‍या दोन टीम बचाव कार्यात आहेत. अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात सहभागी झाले आहे. अंबाझरी परिसरात लष्कराच्या 2 तुकड्या पोहोचत आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या, असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन, पदाधिकारी यांना दिले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news