भंडारा : वारपिंडकेपारत बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांची शिकार | पुढारी

भंडारा : वारपिंडकेपारत बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांची शिकार

भंडारा: पुढारी वृत्‍तसेवा :  सातपुडा पर्वत रांगा आणि ग्रीन व्हॅली चांदपूरच्या विस्तारीत जंगलशेजारील गावांत बिबट्याची दहशत वाढली आहे. वारपिंडकेपार येथे बिबट्याने दहशत माजविली आहे. अशातच गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्या बिबट्याने फस्त केल्याची घटना उघडकीस आली.

वारपिंडकेपार येथे शिशुपाल किरणापुरे यांनी त्यांच्या मालकीच्या शेळ्या गोठ्यात बांधल्या होत्या. रात्रीच्या सुमारास बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. यात दोन शेळ्या ठार झाल्या. वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. गावात बिबट्याचे पगमार्क आढळून आले आहे.

सातपुडा पर्वत रांगांचे घनदाट जंगल व ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाच्या विस्तारित जंगलात वाघ, बिबट व रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वन्यप्राणी गावात व शेतशिवारात धुमाकूळ घालत आहेत. जंगलाशेजारी अनेक गावांचे वास्तव्य आहे. वारपिंडकेपार गावाशेजारी विस्तारीत जंगल असल्याने वन्यप्राणी गावाच्या दिशेने धाव घेत असतात.

-हेही वाचा

Back to top button