Thane Crime News : महिलासह दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या २७६ जणांवर कारवाई

Thane Crime News : महिलासह दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या २७६ जणांवर कारवाई
Published on
Updated on


डोंबिवली: दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यातून धडधाकट इतरांना प्रवास करण्यास मनाई असताना देखील सकाळी-संध्याकाळ गर्दीच्या वेळेत अनेक धटींगण दादागिरी करून अपंगांना त्रास देतात. याची गंभीर दखल घेऊन ॲक्शन मोडवर आलेल्या लोहमार्ग प्रशासनासह पोलिस आणि सुरक्षा बलाने महिलांसह दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या 276 धटींगणांना कारवाईचा दणका दिला. रात्र न्यायालयाने या सर्व धटींगणांना सुटका करताना पुन्हा नियम तोडल्यास जेलवारी घडविण्याच्या इशारा दिला. (Thane Crime News)

मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलवर प्रवाशांचा आधीच ताण असताना उपलब्ध असलेल्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सकाळ-संध्याकाळ गर्दीच्या वेळी अनेक धडधाकट प्रवासी दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात घुसखोरी करून प्रवास करताना आढळून येतात. दिव्यांगांना दादागिरी करणाऱ्या अशा धटींगण प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून नियमित कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर केले जाते. मात्र, कारवाईनंतर लगेच या प्रवाशांना न्यायालयात हजर करण्याची तरतूद आहे. ही कारवाई केवळ दिवसा होत असते. तथापी रात्री कारवाई केल्यास सकाळी न्यायालय सुरू होईपर्यंत या प्रवाश्यांना ठेवायचे कुठे ? हा प्रश्न निर्माण होत आहे. (Thane Crime News)

सहसा रेल्वे प्रशासनाकडून रात्रीच्या वेळेस कारवाई होत नसल्याने महिला व दिव्यांग डब्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या. या तक्रारींची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली. त्यानुसार गुरूवारी कल्याणच्या रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ऋषीकुमार शुक्ला आणि सहाय्यक सुरक्षा आयुक्त टी. रामचंद्रन् यांच्या आदेशांनुसार ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि बदलापूर रेल्वे स्थानकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी दिव्यांग डब्यातून प्रवास करणाऱ्या ठाण्यातून 72, डोंबिवलीतून 67, कल्याणातून 80 आणि बदलापूरमधून 57, अशा 276 धटींगणांना ताब्यात घेतले.

Thane Crime News  : रात्र न्यायालयात फैसला

मात्र इतक्या मोठ्या संख्येने ताब्यात घेतलेल्या या सर्व प्रवाशांना सकाळी न्यायालयाचे कामकाज सुरू होईपर्यंत 10 ते 12 तास ठेवायचे कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाने कल्याण रेल्वे न्यायलयाचे विशेष न्यायाधीश स्वयम्. एस. चोपडा यांच्या सहकार्याने रात्री न्यायालय सुरू केले. त्यासाठी रात्री आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलावून रात्र न्यायालय भरविण्यात आले. रेल्वे सुरक्षा बलाने पकडून आणलेल्या 276 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली.

पुन्हा नियम तोडल्यास जेलवारी

सुटका करण्याचे निर्देश देतानाच पुन्हा नियम तोडल्यास थेट कारावासाची शिक्षा ठोठावली जाईल, अशीही सूचना न्यायालयाने या प्रवाशांना दिली. तसेच प्रवाशांची सुरक्षा रेल्वेसाठी महत्वाची असल्याने यापुढील काळात गरज पडल्यास अशा प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे देखील न्यायालयाने स्पष्ट केले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news