वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
वणी व परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच देवनदीला पूर आला आहे. परिसरात चांगला पाऊस पडल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. आता पर्यंत पडलेल्या पावसाने ओहळ नाल्यांना पाणी आले नव्हते परंतु दोन दिवसांत पडलेल्या पावसात नदी-नाले ओसंडून वाहु लागले आहे. Nashik Rain
तसेच वणी पासून जवळील फोपशी येथील उनंदा नदीला पुर आल्याने पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने येथील वाहतूक थांबली आहे. वणी कडे यायचा रस्ता बंद झाला आहे. हा पाऊस परिसरातील भात शेती तसेच इतर पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. पावसाळ्यातील बरेच दिवस कोरडेच गेले होते. परिसरातील लोकांची चिंता वाढत चालली होती. मात्र दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने काहीशी चिंता दुर केली आहे. नदीनाले ओसंडून वाहू लागले आहे. रात्री पासुन वणी, कृष्णगांव, भातोडे, मुळाणे, बाबापुर, चंडीकापुर, अहिवंतवाडी, मांदाने, पांडाणे, कोल्हेर, पुणेगांव या सर्व भागात मुसळधार पाऊस पडत आहे. वणी येथील देव नदीला पूर आला आहे. महादेव मंदीर नदीकाठी असल्याने अर्धे पाण्यात बुडाले आहे. रात्री पासुन सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते धुवून निघाले आहे.
हेही वाचा :