Naxalites arrested : दोन लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी जेरबंद - पुढारी

Naxalites arrested : दोन लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी जेरबंद

गडचिराेली : पुढारी वृत्तसेवा  

खून, चकमक व अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला नक्षलवादी अजय हिचामी ( वय ३०) यास पोलिसांनी गट्टा-जांभिया परिसरातून आज अटक ( Naxalites arrested ) केली. अजय हिचामी ( Naxalites arrested ) याच्‍यावर २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

खुनाचे ३, चकमकीचे ५ तर दरोड्याचा १ गुन्हा होता दाखल ( Naxalites arrested )

अजय हिचामी हा एटापल्ली तालुक्यातील झारेवाडा येथील रहिवासी आहे. २०१९ मध्ये तो गट्टा दलममध्ये सहभागी झाला. नक्षल्यांच्या ॲक्शन टीमचाही तो सदस्य होता. यंदा गट्टा व बुर्गी पोलिस मदत केंद्रांवर नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग होता.

१८ सप्टेंबर रोजी सुरजागड येथील सोमाजी सडमेक याच्या हत्येत त्‍याचा सहभागी होता. त्याच्यावर खुनाचे ३, चकमकीचे ५, व दरोड्याचा १ असे ९ गुन्हे दाखल आहेत. राज्य शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी केली आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button