भुसावळ तालुक्यात महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांचा तुफानी राडा - पुढारी

भुसावळ तालुक्यात महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांचा तुफानी राडा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारामारीमध्ये अनेक जखमी झाले आहेत. जखमी कार्यकर्त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करत होते. भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे बंद पाळू नका असे आवाहन करत होते. दोन्हीकडून शहरभरामध्ये वेगवेगळा प्रचार केला जात असतानाच दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मारामारी झाली.

दोन्ही बाजूने एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले जात आहेत. आम्ही शांततेमध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बंदला समर्थन द्या असं सांगत असताना भाजपाचे लोक तिथे आला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने वाद झाल्याचं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

भाजप शहराध्यक्ष सुनील महाडिक यांनी आम्ही व्यापाऱ्यांना दुकान बंद करु नका असं सांगत शहरामध्ये फिरत असताना अचानक जमावाने आमच्यावर हल्ला केल्याचा दावा केला.

हे ही वाचलं का?

Back to top button