यवतमाळ जिल्ह्यात गारपीट; वीज कोसळून तीन बैलांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यात गारपीट; वीज कोसळून तीन बैलांचा मृत्यू

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : शुक्रवारी (दि.७) दुपारी यवतमाळसह बाभूळगाव, महागाव तालुक्यात अवकाळी पाऊस बरसला. नेरमध्ये गारपीट झाली. दरम्यान, या पावसामुळे आंब्यासह गहू, कांदा पिकांचे नुकसान झाले. भाजीपाल्यालाही या पावसाचा फटका बसला असून वीज कोसळल्याने महागाव तालुक्यात तीन बैलांचा मृत्यू झाला आहे.

हवामान खात्याने शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात गारपीटीसह वादळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यवतमाळमध्ये या पावसामुळे व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. यवतमाळ शहरात सुमारे अर्धा तास पाऊस बरसला. नेरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. या ठिकाणी गारपीटही झाली असून सुमारे दीड तास झालेल्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे.

बाभूळगाव, महागावमध्येही अवकाळी पाऊस बरसला आहे. दरम्यान, या पावसादरम्यान महागाव तालुक्यातील पेढी येथे दिगंबर माधवराव भाराटे यांच्या शेतात वीज कोसळून त्यात गाईचा मृत्यू झाला. तर महागाव तालुक्यातीलच मौजा संगम येथे धुऱ्यावर बोरीच्या झाडावर वीज कोसळल्याने रेणुकादास वामन शिंदे यांच्या दोन बैलांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मीळताच हिवरा येथील तलाठ्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला असून याचा प्राथमिक अहवाल महागाव तहसीलदारांकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान पावसामुळे अनेकांच्या घरावरील तीनपत्रे उडाली असून गहू, भाजीपाल्यासह आंब्याचे नुकसान झाले आहे तर टरबूज पिकालाही याचा फटका बसला आहे.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news