ब्रम्हपुरी आणि अकोल्याच्या तापामानाने गाठली चाळीशी | पुढारी

ब्रम्हपुरी आणि अकोल्याच्या तापामानाने गाठली चाळीशी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : हवामान खात्याने ६ ते ८ एप्रिल दरम्यान तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी दिवसभराच्या ढगाळ वातावरणात पाऊस कोसळण्याची शक्यता असताना अचानक उष्णतेत वाढ झाली. पूर्व विदर्भातील ब्रम्हपुरी व अकोल्यामध्ये तापमानात वाढ होऊन पारा चाळीशीवर पोहचला. त्यामुळे शहरामध्ये उन्हाळ्याची चाहूल लागली.

दरवर्षी विदर्भात नागरिकांना उन्हाळ्याच्या झळा मार्च पासून सहन कराव्या लागतात. उकाड्यापासून स्व:चा बचाव करण्याकरिता नागरिकांमध्ये कुलर्स लावण्याची लगबग पहायला मिळते. तर ठिकठिकाणी थंड पेयाचे दुकाने थाटले जातात. मात्र यावेळी उन्हाळा सुरू असताना पावसाळ्याप्रमाणे नागरिकांना भास होत आहे.

पंधरवाड्यापासून पूर्व विदर्भात कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे ढगाळ वातावरणात पावसाची गडद छाया सध्या नागरिकांच्या डोक्यावर आहेच. ६ ते ८ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे आणि विदर्भात ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.

शुक्रवारी हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज खोटा ठरला, परंतु मात्र उकाड्याचा त्रास नागरिकांना जाणवला. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात आज ४० अंश सेल्सिअल्स तापामानाची नोंद करण्यात आली. तर अकोला शहरातही तापमानाने ४० शी गाठली. त्या पाठोपाठ यवतमाळ व वाशिम या ठिकाणी पारा चाळीशीच्या जवळ येऊन पोहचला आहे. त्यामुळे आता विदर्भ तापण्याची चाहूल लागली आहे. विदर्भातील चंद्रपूर इतर जिल्ह्याच्या तुलनेत नेहमी उष्ण असतो. यावेळीही चंद्रपूरचा तापामानाकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दर्शविल्याप्रमाणे नागपूर विभागातील नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी केला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यालाच ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटेसह मेघागर्जना तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अधिक वाचा :

Back to top button