अकोला : गुरुशिष्याच्या नात्याला काळीमा; शाळकरी मुलींवर अत्‍याचार प्रकरणी दोन शिक्षकांना अटक | पुढारी

अकोला : गुरुशिष्याच्या नात्याला काळीमा; शाळकरी मुलींवर अत्‍याचार प्रकरणी दोन शिक्षकांना अटक

अकोला; पुढारी वृत्तसेवा : गुरूला सर्वश्रेष्ठ मानणारी आपल्या देशातील संस्कृती; पण या संस्कृतीला काही शिक्षकच काळिमा फासत असल्याचं अकोला जिल्ह्यात उघड झालं आहे. जिल्ह्यातील एका गावातील चार विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. शाळेतील २ शिक्षकांनी हे घृणास्‍पद कृत्‍य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दोन शिक्षकांवर बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, संबंंधित शाळेतील शिक्षकांचे विद्यार्थीनींसोबत अनेक दिवसापासून दुष्कृत्य सुरु होते.  बुधवारी शिक्षकाने एका विद्यार्थीनीवर अत्याचार केला. तिने हा प्रकार घरी सांगितला. यानंतर पीडित मुलीच्‍या पालकांनी शाळेत जावून इतर विद्यार्थीनींसोबत संवाद साधल्‍यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

या प्रकरणी चार विद्यार्थीनींनी ग्रामस्थांसह तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ दोन शिक्षकांवर गुन्‍हा दाखल करुन त्‍यांना अटक केली.  दोन्ही शिक्षकांना आज ( दि. ६ ) न्यायालयात हजर करण्‍यात आले. न्‍यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणातील दोन्ही शिक्षकांवर योग्य ती कारवाई केली जाईल. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.

हेही वाचा; 

Back to top button