

नागपूर; पुढारी ऑनलाईन : मी सध्याच राजकारणातून निवृत्त होणार नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी करीत समर्थकांना सुखावले आहे. काही दिवसांपूर्वी गडकरी यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ घेत त्यांच्या निवृत्तीच्या बातम्या माध्यमातून पुढे आल्याने समर्थक आणि विरोधकांच्या भुवया उंचावल्या होत्या. उलट सुलट चर्चेला जोर आला होता. गुरुवारी (दि.३०) यासंदर्भात केंद्रीय गडकरी यांनी अखेर स्पष्टता केली.
मी असे कधीही बोललो नाही केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी काहीही छापू नका, आपली विश्वासनीयता जपा, असा सबुरीचा सल्लाही यावेळी केंद्रीय नितीन गडकरी यांनी माध्यम प्रतिनिधींना दिला. गडकरी म्हणाले, मी असे म्हणालो की, विकासाची कामे, सामाजिक कामे केली पाहिजेत. कृषी, पर्यावरण, शिक्षण, सेवा अशा सर्व क्षेत्रात कामे केल्यानंतर लोकांकडे आपल्याला केवळ निवडणुकीत मत मागण्यासाठी जाण्याची गरज उरत नाही.
लोक स्वतः निर्णय करतात. आपल्याला मते मागण्यासाठी कुणालाही लोणी लावावे लागत नाही या अर्थाने मी बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. यावेळी राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित होते.
अधिक वाचा :