न्यायालयीन कामकाजाचे ज्ञान नसल्याने 'मविआ'च्या नेत्यांची वक्तव्ये : देवेंद्र फडणवीस | पुढारी

न्यायालयीन कामकाजाचे ज्ञान नसल्याने 'मविआ'च्या नेत्यांची वक्तव्ये : देवेंद्र फडणवीस

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारविरुद्ध कोणतेही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारला ‘नपुंसक’ म्हटले असा कांगावा जे लोक करताहेत, त्यांची वक्तव्ये न्यायालयीन कामकाजाच्या ज्ञानअभावातून आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी केले.

नागपूर येथे रामनवमीच्या निमित्ताने शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांसाठी आले असता माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारविरुद्ध कोणतेही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेले नाही. राज्य सरकारने काय कारवाई केली, हे सांगितल्यानंतर राज्य सरकारविरुद्ध अवमानना नोटीस किंवा कोणताही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले, संभाजीनगरला घडलेली घटना दुर्दैवी आहे.

शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात असताना काही नेते भडकावणारे वक्तव्य देऊन परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न करत आहेत. खरेतर आपली शहरे शांत ठेवण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे. आज रामनवमी आहे. जे नेते राजकीय वक्तव्य देऊन तेथील परिस्थिती आणखी बिघडावी, असा प्रयत्न करताहेत, ते दुर्दैवी तर आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button