चंद्रपूर : माजी मंत्री हंसराज अहिर यांच्या पुतण्यासह मित्राचा संशयास्पद मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : माजी मंत्री हंसराज अहिर यांच्या पुतण्यासह मित्राचा संशयास्पद मृत्यू

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर येथील माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या पुतण्या व त्‍याच्‍या मित्राचा मृतदेह चंदीगडमध्ये संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. महेश हरिश्चंद्र अहीर आणि हरीश धोटे अशी त्‍यांची नावे आहेत. या घटनेने चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रपूरचे माजी मंत्री हंसराज अहीर यांचे पुतणे महेश हरिश्चंद्र अहीर आणि त्यांचा मित्र हरीश धोटे हे आठ-दहा दिवसांपूर्वी चंदीगडला गेले होते. मोबाईल बंद असल्याने दोघांचेही नातेवाईकांचा आठवडाभरापासून संपर्क झालेला नव्हता. त्‍यांचे कुटुंबीय चिंतेत होते. अखेर 15 मार्च रोजी महेश आणि हरीशच्या नातेवाईकांनी चंद्रपूर पोलीस ठाण्यात दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेतला असता बुधवरी (दि.२२ ) पोलिसांना चंदीगडच्या सेक्टर 36 पोलिस स्टेशन अंतर्गत एका ठिकाणी संशयास्पद स्थितीत आढळले. या घटनेची माहिती सायंकाळी चंद्रपुरात मिळताच शहरात खळबळ उडाली. दोघांची हत्या झाली की आत्महत्या? याबाबत चंदीगड पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button