चंद्रपूर : दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक; एक ठार | पुढारी

चंद्रपूर : दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक; एक ठार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : सिंदेवाही मार्गावरील चिंद्यादेवीच्या जवळ दोन मोटार सायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.२१) रात्री घडली. रामा शिवा नैताम (वय ४९) रा. गुंजेवाही, असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत गुंजेवाही येथील रामा नैताम व बाळकृष्ण वासुदेव टेकाम (वय ५०) हे इलेक्ट्रिक साहित्य आणण्यासाठी सिंदेवाही तालुक्याच्या ठिकाणी गेले होते. सामान घेऊन परत येत असताना चिंद्यादेवीच्या चढाजवळ सामान पडले. त्यामुळे मोटरसायकलवरून सहकारी रफिक शेख खाली उतरून सामान उचलण्यास गेला. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेला मोटारसायकलस्वार बाळकृष्ण याचा मोटारसायकलवरील ताबा सुटला. त्याने रामा नैताम याच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात रामा गंभीर जखमी झाला. त्याला सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालय हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Back to top button