हिंगोली: आखाडा बाळापूर येथे भुसार मालाचे दुकान फोडले, सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरीला | पुढारी

हिंगोली: आखाडा बाळापूर येथे भुसार मालाचे दुकान फोडले, सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरीला

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा: येथील बाजार समितीसमोरील गजानन अमीलकंठवार यांच्या दुकानातून सोयाबीन, चना असा ३ लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. त्यानंतर मंगळवारी (दि. २१) रात्री नांदेड – हिंगोली रोडवर ग्रामीण रुग्णालयासमोरील अमाने ट्रेडिंग कंपनी हे भुसार मालाचे दुकान फोडून चना व सोयाबीनचे ३९ कट्टे असा सव्वा लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमाने ट्रेडिंग कंपनीचे मालक प्रभाकर गंगाधर रामाने मंगळवारी संध्याकाळी सात वाजता दुकान बंद करून गेले. त्यानंतर रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनाच चोरी झाल्याचा प्रकार समजला. त्यानंतर पोलिसांनी अमाणे यांना कळविले.
भुसार मालाच्या चोरीचा तपास सुरू असतानाच चोरट्यांनी दुसऱ्या रात्रीच दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर चनाचे भरलेले २१ कट्टे व सोयाबीनचे १८ कट्टे असा सव्वा लाखांचा माल चोरून नेला.

विशेष म्हणजे मुख्य रस्त्यावर चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून चोरी केली आहे. त्यांनी चारचाकी वाहनाचा वापर केल्याचे दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी चोरी झाल्याने आखाडा बाळापूर पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा

हिंगोली : आखाडा बाळापूर येथील दुकानातून ३ लाखांचे सोयाबीन चोरीस

हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील २ हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका

हिंगोली आगाराच्या बसचालकावर कुत्र्याचा हल्‍ला; चालक गंभीर जखमी

 

Back to top button