

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : डोंबिवलीत नवीन वर्षाचे स्वागत शोभा यात्राकाढून करण्यात आले. या स्वागत यात्रेचे यावर्षी २५ वे वर्ष होते. स्वागत यात्रेत अनेक चित्र रथांसह अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. यावेळी पर्यावरणीय रक्षण ,जल अभियान यासारख्या गोष्टींवर चित्र रथात अधिक लक्ष केंद्रित केले होते. वसुदेवम् कुटुंबकम् या संकल्पनेवर आधारित ही स्वागत यात्रा काढण्यात आली.
या शोभा यात्रेत एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, आठ महिन्यात धाडसी निर्णय घेणारे देशातील हे पहिले राज्य आहे. राज्याच्या विकासाबरोबर सांस्कृतिक भूकही पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. याची सुरुवात डोंबिवलीतील झाल्याचा मला अभिमान आहे. फडके रोडवरील गणेश मंदिराचे हे १०० वे वर्ष असून गणपती मंदिरासाठी अपेक्षित असलेली सर्व मदत सरकारकडून केली जाईल असे त्यांनी जाहीर गेले.
भाजपचे मंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी संघाच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षापासून ही शोभ यात्रा सुरू ठेवली आहे. हाच संकल्प पुढील येणाऱ्या पिढीने सुरू करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
या शोभा यात्रेत आकाश ठोसर आणि सायली पाटील यांनी सहभागी होत ढोल वाजवताना पाहायला मिळाले. तर आकाश ठोसर ढोल वाजवत असताना सायलीने ढोलाच्या तालावर नृत्य केले.
दरवर्षी प्रमाणेच ढोल ताशा पथकाचा उत्साह शिगेला पोहचला होता. यावेळी जवळपास १५ ते २० पथके यामध्ये सहभागी झाली होती. अनेक पथकांमध्ये लहान मुलांचा देखील सहभाग बघायला मिळला.
एका 75 वर्षीय आजोबांनी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकात काठी लाठी चलवल्याने सर्वच जण या वयात देखील आजोबांचे सर्वांकडून कौतुक केले गेले.
पारंपरिक वेशभूषा करून आलेल्या तरुणाईचा उत्साह शिगेला पोहचला होता. ढोल ताशाच्या गजरात तरुणाईचे पाय आपसूकच थिरकत होते. इतकेच नव्हे तर सर्वच तरुण सेल्फी काढण्यात दंग झाले होते.
.हेही वाचा