पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ओशो आश्रमाबाहेर अनुयायांचा गोंधळ; पोलिसांकडून लाठीचार्ज, अनेकांना घेतलं ताब्यात | पुढारी

पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ओशो आश्रमाबाहेर अनुयायांचा गोंधळ; पोलिसांकडून लाठीचार्ज, अनेकांना घेतलं ताब्यात

पुणे: ओशहरातील ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून काही अनुयायांनी आश्रमात प्रवेश केला आहे. यावेळी पोलिसांनी ओशो अनुयायांवर लाठीमार केला. तसेच काही अनुयायांना ताब्यात घेतले आहे.

रजनीश ओशो यांच्या 70 व्या संबोधी दिवसानिमित्त जगभरातून आलेल्या अनेक ओशो शिष्यांना मंगळवार २१ मार्च रोजी कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमात माळ घालून प्रवेश देण्यात आला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी आश्रमाच्या ट्रस्टींनी अनुयायांना माळ घालून आश्रमात येण्यास परवानगी नाकारली. अखेर आश्रम व्यवस्थापनाच्या दबावाला बळी न पडता जबरदस्तीने गेट उघडून अनुयायांनी आश्रमात प्रवेश केला.

पुण्यातील ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या व्यवस्थापनाने ओशो शिष्यांना ओशोंची माळा गळ्यात घालून प्रवेश प्रतिबंध करण्याच्या, ओशो जयंती, ओशो महापरिनिर्वाण, गुरुपौर्णिमा, ओशो संबोधी दिवस असे कोणत्याही प्रकारचे उत्सव साजरे न करणे आणि आश्रमाची जागा विक्रीला काढून ओशोचे विचार संपवण्याच्या प्रयत्नाच्या विरोधात ओशोंच्या शिष्यांनी एकत्र येऊन निदर्शनेही केली.

Back to top button